मासेमारी करण्यासाठी गेलेल्या वडील व मुलाचा ढिगार्याखाली दबून मृत्यू झाल्याची शक्यता.

मासेमारीसाठी गेलेल्या वडील व मुलाचा दुर्दैवी अंत

राखी चे ढिगारे पाण्यात कोसळून घटना घडली.


वरोरा
चेतन लुतडे 

वरोरा जवळील नंदोरी या गावांमध्ये मोठ्या  प्रमाणात काळ्या गिट्टीच्या खदानी आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात शेकडो फिट खोल गड्डे खोदून गौणखनिजाचे उत्खनन केल्या जात आहे. 
शेकडो फिट गड्डे खोदल्यानंतर शासनाचा महसूल वाचवण्यासाठी या गड्ड्यांना वरोरा येथील औष्णिक विद्युत केंद्रातून निघालेल्या राखीतून हे गड्डे बुजवण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

असाच प्रकार नंदुरी येथील पंकज जैन खदानीच्या परिसरात घडला आहे. नंदोरी येथील स्थानिक मजुरांचे  मुले या ठिकाणी मासे पकडण्यासाठी मंगळवारी गेले होते. यानंतर पाण्याजवळ दोघे जात असताना राखे चे ढिगारे खचून पाण्यामध्ये दुर्दैवी अंत झाला. यामध्ये  मुलांचा व वडिलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सोबत असलेल्या दोन मुलांनी गावात जाऊन सांगताच परिसरातील लोकांनी आरडाओरडा करत या खदानी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हे ठिकाण निर्जन स्थळी असून मदत न मिळाल्याने रामचंद्र जंगेल वय60, योगेश जंगेल वय 27याचा दुर्दैवी अंत झाला. 
मात्र या मृत्यूसाठी जबाबदार कोण असा सवाल आता उत्पन्न झाला आहे.
जैन नामक कंपनीच्या खदानी याचबरोबर या परिसरात असलेल्या इतर कंपन्या अशा प्रकारचा सर्रास वापर करून गौणखणीज काढल्यानंतर ती जागा महसूल विभागाला दिसू नये यासाठी राखेने गड्डे भरले जाते. आणि त्यावरती साध्या मातीचा भरणा केला जातो. त्यामुळे सर्वसामान्यांना चालताना असे जाणवते की इथे जमीन आहे परंतु ही जमीन पोकळ असल्याने बरेचदा असे अपघात होण्याची शक्यता असते.
कालपासून जेसीबी द्वारे माती काढण्याचे काम सुरू असून मुलाला व वडिलाला काढण्याचे काम सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत शव मिळाले नव्हते.
प्रशासकीय योजना या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.
आतापर्यंत एका मुलाचे शव मिळाले असून वडीलाचे शव मिळणे बाकी आहे.
वारंवार या ठिकाणी अपघात होऊन सुद्धा प्रशासकीय संबंधित अधिकारी याबाबत दुर्लक्ष करताना दिसत आहे.

एकच गड्डा साडेपाच एकरचा आहे. अशा प्रकारचे अनेक गट्टे या परिसरात भरले गेले आहे. ही राख कुठून आणली होती व खदान कशा पद्धतीने भरायची होती याबद्दलही चौकशी होणे गरजेचे आहे.


Comments