वाघिणीचा वडगाव शेत शिवारात मृत्यू .

वाघिणीचा वडगाव शेत शिवारात मृत्यू .

वरोरा
चेतन लुतडे

ताडोबा अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध आहे. शासनाच्या योग्य नियोजनामुळे वाघाची संख्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाढलेली आहे. त्यामुळे हे प्राणी जंगलाला लागून असलेल्या गाव खेड्यात प्रवेश करीत आहे. त्यामुळे गावातील शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना याचे नुकसान सहन करावे लागत आहे. 
 वाघांची दहशत असल्याने रात्री शेतीमध्ये जीव मुठीत धरून जावे लागते. त्यामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी विद्युत प्रवाहचा वापर बहुतेक शेतामध्ये केला जातो.
अशातच वाघ अशा तारांना अटकून बहुदा मरण पावतो.

शनिवारी रात्रीच्या घडलेल्या घटनेमध्ये एका वाघाचा मृत्यू झाला असून हा वाघ खांबाडा परिसरातील वडगाव येथील गावातील शेत शिवारातील नाल्यामध्ये आढळून आला. वनविभागाला या संबंधात माहिती मिळतच वरोरा येथील पथक रवाना झाले. यानंतर वाघिणीची शव उच्चत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. वाघीण कशाने मृत पावली असेल याचा अंदाज वनविभाग घेत आहे. वाघाचा पाण्यात मृत्यू होणे शक्य नसल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. 
या वाघिणीला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.
वरोरा  शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर असणारे खांबाडा परिसरातील वडगाव-मुरदगाव रस्तावरील नाल्यामध्ये दिनांक 10/12/2023 रोजी दुपारी 01.30 वाजताचे दरम्यान एक वाघ (मादी) मृत अवस्थेत आढळून आली.  वरोरा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी व श्री. बंडूजी धोतरे, अध्यक्ष ईको-प्रो संस्था तथा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण प्रतिनीधी, मुकेश भांदककर, प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपुर यांचे प्रतिनिधी, विशाल मोरे अपास वन्यजीव प्रेमी यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी सतिश के. शेंडे व वनकर्मचारी यांनी मोका पाहणी करुन मृत वाघाचे (मादी) मोका पंचनामा केला व वाघाचे शवविच्छेदन करण्याकरीता TTC चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.

पुढील चौकशी मा. प्रशांत खाडे विभागीय वनअधिकारी चंद्रपूर, मा. घनश्याम नायगमकर सहाय्यक वनसंरक्षक, चंद्रपूर (अतिरिक्त) यांचे मार्गदर्शनात सतिश के. शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा व डि. बी. चांभारे क्षे.स. टेमुर्डा, जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, एस.डी. खोब्रागडे क्षे.स. वरोरा, जी. डी. केजकर वनरक्षक टेमुर्डा, एन. के. करकाडे वनरक्षक केम, ए. ई. नेवारे, वनरक्षक आजनगाव करीत आहे.





Comments