वैज्ञानिक निखिल नाकाडे यांची गांधी उद्यान योग मंडळा सोबत भेट.चंद्रयान 4 सुद्धा यशस्वी होणारच.

वैज्ञानिक निखिल नाकाडे यांची गांधी उद्यान योग मंडळा सोबत भेट.

चंद्रयान 4 सुद्धा यशस्वी होणारच.



चेतन लुतडे
वरोरा

वैज्ञानिक निखिल नाकाडे हे आपल्या वरोरा शहरातील रहिवाशी असून लहानपणापासून त्यांचे शिक्षण वरोरा शहरात झाले आहे. उच्च शिक्षण घेऊन ते चंद्रयान तीन मधील कामासाठी इसरो मध्ये सामील झाले होते. नुकतेच ते आपल्या स्वगावी वापस आल्यानंतर गांधी उद्यान योग मंडळानी वैज्ञानिक निखिल नाकाडे यांना भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
इस्रो सारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये काम करीत असलेले वरोरा शहरातील भूषण वैज्ञानिक निखिल नाकाडे वरोरा शहरात येताच त्यांच्या इष्ट मित्रांनी चंद्रयान 3 बद्दलची माहिती जाणून घेतली.व त्यांनी केलेल्या कामाबद्दल  गांधी उद्यान योग मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नेमाडे यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांच्या घरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण सुराणा, खेमराज कुरेकार, बबलू दुगड, दादा जयस्वाल यांच्यासह अनेक गांधी उद्यान मंडळातील सदस्य उपस्थित होते. 

 चंद्रयान तीन मध्ये कोणकोणत्या अडचणींना सामना करावा लागला. हे अभियान कशासाठी राबविण्यात आले होते. आणि याचा फायदा भारताला कितपत मिळेल. अशा अनेक चर्चा यावेळी पत्रकार व गांधी उद्यान योग मंडळा सोबत करण्यात आल्या. 
मात्र या अभियानानंतर चंद्रयान 4 पाठवण्यासाठी भारत सज्ज असून या अभियानात चंद्रावरील नमुने एकत्र करून पृथ्वीवर वापस आणल्या जातील याबद्दलची मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

चंद्रयान तिन मध्ये दक्षिण ध्रुवावर पाण्याचा अंश असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम असे अनेक घटक चंद्रावर असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हेलियम 3 हा घटक आपल्याला पृथ्वीवर आणण्यासाठी सर्वात कठीण काम असल्याचेही त्यांनी सांगितले. 
त्यामुळे येणाऱ्या काळात चंद्रावरती बेस स्टेशन भारत मित्र राष्ट्रांसोबत सुरू करणार अशी आशा व्यक्त केली. जेणेकरून पुढील प्रवास चंद्रावरून करता येईल. त्यामुळे नवीन अभ्यासक्रमात या क्षेत्रात चांगली संधी असून विद्यार्थ्यांनी याकडे वळावे अशी आशा व्यक्त केली.

अशा अनेक तांत्रिक बाबी चंद्रयान तीन मधील अडचणी त्यांनी सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या. महत्त्वाचे म्हणजे चंद्रयान तीन संपूर्णपणे स्वदेशी असून भारतीय टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे. 
चंद्रयान तीन मध्ये महत्त्वाची अडचण म्हणजे सिग्नल पोहोचवणे हे होते त्यामुळे नासाची मदत घेऊन ही अडचण दूर करण्यात आली. इंडिया मधून सिग्नल पाठवण्यासाठी 17 तास लागतात तर नासा मधून एक तासात चंद्राच्या साऊथ पोलवर सिग्नल पोहोचवता येतात असे त्यांनी समजावून सांगितले. 

यावेळी आपल्या परिसरातील विद्यार्थी इसरो मध्ये फार कमी प्रमाणात प्रवेश घेत असून कर्नाटक , केरळ, तामिळनाडू राज्यातील विद्यार्थी इसरो इन्स्टिट्यूट मध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत असतात. आपल्याकडील विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑनलाईन माहिती मिळवून या क्षेत्रात उतरण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

गांधी उद्यान योग मंडळांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देत वरोरा शहराचे नाव रोशन केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केला.

Comments