*बोर्डा ग्रामपंचायत सदस्य उमेश देशमुख यांच्या नेतृत्वात युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश* *आमदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित प्रवेश*
*आमदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित प्रवेश*
वरोरा : फुले - शाहू- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेले उमेश देशमुख वरोरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बोर्डा ग्रामपंचायतचे गेल्या अडीच वर्षापासून कुठल्याही पक्षाशी बांधील न राहता सदस्यत्व पद भूषवित आहे. परंतु काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या विकास कार्याचा धडाका पाहता त्यांच्या कार्याने प्रभावित होत काँग्रेस पक्ष बळकटी करण्यासाठी तसेच आमदार महोदय धानोरकर यांचे हात बळकट करून गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य उमेश देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो सुशिक्षित युवकांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ताजने अर्चित गलांडे, प्रेषित तेलंग, मधुकर वाढई, सचिन कडवे, मंगेश चेंदे, उमेश काकडे, दीपक वरुडकर, तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला.
याप्रसंगी बोर्ड ग्रामपंचायतच्या सरपंच्या ऐश्वर्या खामनकर, युवक काँग्रेस प्रदेश प्रवक्ते अमर भाई गोंडाने, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र बगडे, प्रतिमा कातकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजुभाऊ चिकटे, राहुल नन्नावरे, शरद आसुटकर, प्रदीप उरकुडे तसेच भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल भाऊ चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment