वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

महिलांच्या स्तनांचा कर्करोग तपासणी व निदान शिबिर.

महिलांच्या स्तनांचा कर्करोग तपासणी व निदान शिबिर.
एक जुलै डॉक्टर दिनाचे औचित त्यावर कर्करोग निदान शिबिर

वरोरा
चेतन लूतडे

स्वर्गीय विनायकराव वझे स्मृती प्रित्यर्थ सुयोग 
हॉस्पिटल वरोरा, भारतीय जनता पार्टी,व रोटरी क्लब, वरोरा, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मॅमोग्राफी टेस्ट मॅमोग्राफी टेस्ट शिबिराचे आयोजन १जूलै ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे घेण्यात येत आहे.

महिलांमधील वाढत्या कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेऊन वरोरा व भद्रावती तालुक्यातील गरजू लोकांसाठी महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाची तपासणी व निदान शिबिर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे १ जुलै ते ५ जुलै २०२३ रोजी सुरू होत आहे. यासाठी    ३५ते ६० वयोगटातील महिलांसाठी  गरजू महिलांनी सकाळी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नोंदणी करून तपासणी साठी  यायचे आहे.
प्रत्येक दिवशी तज्ञ डॉक्टर कडून महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी व निदान सकाळी १०.०० ते २:०० पर्यंत करण्यात येणार आहे.

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या विशेष सहकार्याने स्वर्गीय विनायकराव वझे स्मृतिप्रित्य सुयोग हॉस्पिटल वरोरा, बीजेपी पक्ष, व रोटरी क्लब वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर दिनाच्या औचित त्यावर डॉक्टर सागर वझे यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.

अधिक माहितीसाठी नितेश जयस्वाल 9822942186 मधुकर फूलझेले 9923740741, विशाल जाजू 9822576661 , शब्बीर बोहरा 9921031252 यांच्यासोबत संपर्क साधावा.

Comments