वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक भाजपा आघाडीला ९ तर काँग्रेसला ८ जागा व एक जागा शिंदे गटाला

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक भाजपा आघाडीला ९ तर काँग्रेसला ८ जागा व एक जागा शिंदे गटाला

वरोरा तालुका प्रतिनिधि :   कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीच्या काल झालेल्या  मतदानाची काल,( २९ एप्रिल) रोजी मतमोजणी पार पडली. या मतमोजणीत सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून परीवर्तन पॅनल चे नऊ उमेदवार तर काँगेस चे आठ उमेदवार तर एक शिंदे शिवसेनेचे एक उमेदवार निवडून आले .
परिवर्तन पॅनल चे डॉक्टर विजय रामचंद्र देवतळे, जयंत मोरेश्वर टेंभुर्डे, अभिजीत पावडे, दत्ता बोरेकर, बाळू उर्फ विठ्ठल भोयर हे विजयी घोषित करण्यात आले.
महिला गटात संगीता वासुदेव ऊरकांदे आणि कल्पना टोंगे यांनी बाजी मारली. तर इतर मागासवर्गीय गटात राजेश वामनराव देवतळे आणि विमुक्त भटक्या  जमाती गटात विलास झिले यांनी बाजी मारली. 
काँग्रेसच्या आठ उमेदवारांमध्ये दिनेश महादेव कष्टी,  तर शिंदे गटाचे नितीन निवडूण आले . या गटात ७९ मते बाद ठरविण्यात आली हे विशेष.

     
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटांमध्ये  काँगेस चे गणेश चवले, राजेंद्र चिकटे, तर अनु जाती जमाती गटातून  हरीश जाधव तर दुर्बल गटातून  पुरुषोत्तम पावडे, यांनी बाजी मारली या गटात ३७ मध्ये बाद ठरविण्यात आली.
 अडते व  व्यापारी गटात नीरज गोठी आणि प्रवीण मालू यांनी विजय मिळवला. तसेच हमाल/ मापारी गटात पांडुरंग झाडे यांनी विरोधकावर मात केली.
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात भाजपा, राष्ट्रवादी, मनसेचे राजूरकर,ठाकरे गटाचे रवी शिंदे व काँग्रेसचेच डॉ विजय देवतळे व भाजपचे करण देवतळे समर्थित   पक्षाने  विरोधकांनी एकत्र येऊन शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी तयार केली होती. तर  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी शेतकरी एकता पॅनलच्या माध्यमातून उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. परंतु या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या खासदार-आमदार गटाकडून टाकण्यात आलेले शेतकरी विकास पॅनल आणि भाजपा आघाडीचे शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी यांच्यातच खरी लढत झाली. आणि या लढतीत काँग्रेस समर्पित शेतकरी विकास आघाडी पॅनलला आठ तर भाजपा प्रणित शेतकरी सहकार परिवर्तन आघाडीला नऊ जागा मिळाल्या तर एका जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाचे नितीन मत्ते हे निवडूण आले.
 निर्णय अधिकारी म्हणून चंद्रपूर येथील श्रेणी-१ चे लेखापाल शिरीष गोडे यांनी काम पाहिले.
सभापती कोण होणार याकडे लक्ष !
 
निकालानंतर सभापतीसाठी दावेदार असणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त असून कोणाचा सभापती बसेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असले  तरी परीवर्तन पॅनलचा सभापती होईल असे नेत्यांकडून सांगीतले जात असून, एकला चलो रे भूमिकेत असलेले शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गटाचे) नितीन मत्ते यांना दोन्ही पक्षातर्फे मनधरणी करत असून आता एकनाथ शिंदे गट कोणाकडे वळतो याचे लक्ष लागले आहे. 

निवडून आलेल्या उमेदवाराची मतसंख्या ही असून सेवा सहकारी संस्था
१)डॉक्टर देवताळे  ४०१,जयंत टेंमूर्डे३४९,बाळू भोयर २७६,दत्ता बोरेकर २८१,अभिजीत पावडे २७४,दिनेश कष्टी २६१,नितीन मते २५२ मते मिळाले असून अवैध मते ७९ आहेत.महिला मध्ये कल्पना टोंगे३४३,संगीता वासुदेव उरकांदे३३२,३९बाद मते ,ओ बी सी
राजेश देवतळे४१९,
55 मते बाद झाली.
भटक्या जमातीतील विलास झिले 432 मते मिळाली
 ग्रामपंचायत गटात मध्ये गणेश चवले 275,राजेंद्र चिकटे 284 मते मिळाली व 
45 मते अवैध ठरली .दुर्बल गट मध्ये पुरुषोत्तम पावडे 298 मते मिळाली.
बाद 31मते झाली.अनुसूचित जाती जमाती मधुन हरी जाधव 308 मते तर 
33 मते बाद ठरली.व्यापारी गटा मध्ये नीरज गोठी ६५ व प्रवीण मालू६४ तर 
अडते हमाल मध्ये पांडुरंग झाडे ३७ मते मिळाली.

Comments