बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल

बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल बातमी:30/4/2026 वरोरा : तालुक्यातील बांद्रा येथे अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १,०८० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी पोलिस पथक पेट्रोलिंगदरम्यान असताना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बांद्रा येथील सुरज उमेश दोहतरे हा आपल्या घरी अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली. कारवाईदरम्यान सुरज दोहतरे घरी नसल्याने त्याची पत्नी वनिता सुरज दोहतरे (वय २७) हिची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी पंचासमक्ष घरझडती घेतली असता स्वयंपाकघरातील भांड्याखाली कापडी पिशवीत ९० एम.एल.च्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या २७ बाटल्या देशी दारू आढळून आल्या. सदर दारूबाबत कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. नमुना म्हणून एका बाटलीला सील करून रासायनिक विश्लेषणासा...

एसटीचा फुटला टायर; खासदारानी दिला प्रवाशांना मदतीचा हात*

*एसटीचा फुटला टायर; खासदारानी दिला प्रवाशांना मदतीचा हात*

*खासदार बाळू धानोरकरांची दाखविले पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन*

चंद्रपूर : संवेदनशील खासदार म्हणून बाळू धानोरकर यांची ओळख आहे. अनेकदा त्यांनी कृतीतून दाखवून देखील दिले आहे. आज देखील चिमूर आगारातील एसटी बस चंद्रपूर येथे येत होती. ताडालीजवळ टायर फुटल्याने चार तासापासून उभी होती. चंद्रपूर येथे जात असतांना खासदार बाळू धानोरकर यांचे लक्ष गेले. त्यावेळी त्यांनी गाडी थांबवून प्रवाश्यांची विचारपूस केली. त्यावेळी दोन वयोवृद्ध प्रवासी उपचारासाठी ताटकळत होते. ही बाब लक्षात येताच 
खासदार बाळू धानोरकर यांनी स्वतःच्या गाडीत त्यांना चंद्रपूरला आणले. तसेच इतर प्रवाशांसाठी  तत्काळ पर्यायी बस उपलब्ध करून दिली. खासदार बाळू धानोरकर यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल प्रवासी आणि नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.

Comments