कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मधमाशी पालन चे धडे दिले.रावे विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मधमाशी पालन चे धडे दिले.

रावे विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम

वरोरा
चेतन लूतडे 

आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील रावे विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मधमाशी पालनाचे मार्गदर्शन केले. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. येणाऱ्या भविष्यात कृषी व्यवसायासोबत मधमाशी पालन हा पूरक व्यवसाय करून भरघोस नका मिळू शकतो याविषयी व्यवसाईक शिक्षण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांतर्गत देण्यात आले.

वरोरा तालुक्यातील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या या अभिनव उपक्रमामुळे शेतकरी वर्गातील कुटुंबीयांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे. मधमाशी पालन या विषयी सविस्तर माहिती देऊन त्यांचे प्रात्यक्षिक दहावीच्या विद्यार्थ्यांना करून दाखविले. यावेळी आवश्यक साहित्य व व्यवसायात घेण्याची काळजी व वार्षिक उत्पन्न, बाकीच्या पिकांवर पडणारा प्रभाव, मधमाशीपालनाची अद्यावत पद्धत , त्यांचे प्रमुख खाद्य, त्यांच्या प्रमुख जाती, यावर सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले.
मध , परागकण इत्यादी मिळविण्यासाठी मधमाश्या पाळल्या जातात . हा एक कृषी उद्योग आहे. मधमाश्या फुलांच्या रसाचे मधात रूपांतर करतात आणि पोळ्यात साठवतात. जंगलातून मध गोळा करण्याची परंपरा फार पूर्वीपासून लोप पावत चालली आहे.बाजारात मध आणि त्याच्या उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे, मधमाशीपालन हा एक फायदेशीर आणि किफायतशीर व्यवसाय म्हणून आता प्रस्थापित झाला आहे. मध आणि मेण हे मधमाशी पालनाचे उत्पादन म्हणून आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व नैसर्गिक संपत्तीचे जनत करण्यासाठी त्याचा फायदा होतो. जमिनीची होणारी धुप आणि काही ठिकाणी शेतीत पाण्याचा अतिरिक्त वापर या गोष्टीमुळे जमिनीचा पोत कमी होणे आणि बी-बियाणे, खताच्या वाढत्या किंमती, रोजमजूरी, वाढते दर या सा-या खर्चामुळे शेती उत्पादन आणि होणारा खर्च याचे व्यस्त होत चाललेले प्रमाण या दृष्टीने मधमाशा पालन हा उद्योग कमी खर्चात, शेतीपुरक व्यवसाय ज्यातुन शेती उत्पादन वाढ या दृष्टीने उपयुक्त उद्योग म्हणून मधमाशा पालन उद्योगाकडे पहावे लागेल.मधमाशी पालनासाठी कमी वेळ, कमी खर्च आणि कमी पायाभूत भांडवली गुंतवणूक आवश्यक आहे,
मध आणि मधमाशीचे मेणही कमी उत्पन्न देणाऱ्या शेतातून तयार करता येते.

मधमाशी पालनाचा पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होतो. अनेक फुलांच्या वनस्पतींच्या परागीकरणात मधमाश्या महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा प्रकारे ते सूर्यफूल आणि विविध फळांचे उत्पादन प्रमाण वाढवण्यास मदत करतात.मधुमक्षिका या कृषीपूरक व्यवसायाला प्रमुख व्यवसायाचे स्थान मिळवून देण्यासाठी आनंद निकेतन कृषी महाविद्यालय , आनंदवन, वरोरा मधील RAWE विद्यार्थ्यांनी आनंदवन माध्यमिक महाविद्यालय, आनंदवन मधील दहावी च्या विद्यार्थ्याना मधमाशी पालनाचे धडे दिले . या प्रशिक्षणा मध्ये अध्यक्ष म्हणून आनंद माध्यमिक विद्यालया च्या मुख्याध्यापिका  सौ.विद्या गोखरे यांनी विद्यार्थिनीं ना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सहकार्य केले . यामध्ये रिया गेडाम , तेजस बोरकर , नुपूर बीसेन , मोनाली गावंडे , अदिती दिक्षित , तन्वी देशमुख , ईशा ढोक , रूषाली पवार यांनी प्रामुख्याने मधमाशी पालन कसे करावे , व्यवसाय करतांनी कुठली काळजी घ्यायची , मधमाशी पालनाचे फायदे , संरक्षक कपडे , मधमाशी पालन योजना ,  मधमाशांच्या जाती याबद्दल माहिती दिली . या प्रशिकक्षणासाठी प्राध्यापक सुहास पोतदार , डॉ. रामचंद्र महाजन , विशेषतज्ञ श्री.नितीन गजबे व डॉ. सरिता दुधकावळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .

Comments