वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोरा पोलीसांनी दोन मंदीर चोरीतील दोन आरोपींना केले अटक

वरोरा पोलीसांनी दोन मंदीर चोरीतील दोन आरोपींना केले अटक

वरोरा 

 पोलीस स्टेशन वरोरा हद्दीतील श्री सद्‌गुरू जगन्नाथ बाबा देवस्थान पाझुर्णी येथे दि.०८/०५/२०२५ रोजी चे मध्यरात्री दरम्यान दानपेटीतील रकमेची चोरी झाली होती त्यावरून पो.स्टे. वरोरा येथे अप क्र.३०६/२०२५ कलम ३३१ (४), ३०५ (अ) भा. न्या. संहीता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दिनांक १५/०५/२०२५ रोजी चे मध्यरात्री दरम्याण माँ. भवानी माँ. गंगाई माता मंदीर पांडूर्णी येथे दानपेटीतील रकमेची चोरी झाली होती त्यावरून पो.स्टे. वरोरा येथे अप क. ३२०/२०२५ कलम ३३१ (४), ३०५ (अ) भा. न्या. संहीता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरील प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध वरील कलमान्वये पोलीस स्टेशन वरोरा येथे गून्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्हे दाखल होताच वरोरा पोलीसांनी तपासाचे चक्र फिरवून गोपनिय माहीती काढून आरोपी नामे १) प्रिनल सुरेश वरभे वय २५ वर्ष धंदा मजुरी २) सुरज गजानन देवतळे वय २६ वर्ष धंदा मजुरी दोन्ही राहणार माढेळी ता. वरोरा जि. चंद्रपूर यांना दिनांक १६/०५/२०२५ रोजी ताब्यात घेवून वरील गुन्ह्यात संबंधाने चौकशी केली असता, वरील दोन्ही आरोपींनी दोन्ही मंदीरात चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींना वरील गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई मा.श्री पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक मॅडम चंद्रपूर, मा. नयोमी साटम मॅडम सहायक पोलीस अधिक्षक तथा पोलीस उपविभागीय अधिकारी, वरोरा तसेच पोलीस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे सा. यांचे मार्गदर्शनामध्ये, सपोनि. शरद भस्मे, पो. अं. संदीप मुळे, पो.अं. विशाल राजुरकर, पो. अं. मनोज ठाकरे, यांनी केली.



Comments