अतुल कोल्हे भद्रावती-
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस "शिक्षक दिन" म्हणून साजरा करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल. एस. लडके, प्रमुख अतिथी डॉ. प्रिया शिंदे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ, भद्रावती, श्री विशाल गौरकार व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सौ. डॉ अपर्णा धोटे उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्याअर्पन व पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली.
याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. अपर्णा धोटे यांनी केले त्यात त्यांनी आपण शिक्षक दिन का साजरा करतो व त्या मागचे उद्देश स्पष्ट केला तसेच सत्र 2023-24 मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या आयोजना मागचा हेतू स्पष्ट केला.
तसेच डॉ. प्रिया शिंदे यांनी स्वतंत्र भारताचे प्रथम उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या यशामागे त्यांच्या जिद्द, चिकाटी व मेहनत यावर प्रकाश टाकला.
तसेच श्री विशाल गौरकार यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
याप्रसंगी सत्र 2023-24 मधील महाविद्यालयातून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून बक्षीस व शिष्यवृत्तीचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बी.ए. भाग तीन ची विद्यार्थिनी कुमारी प्रणिता वाबिटकर या विद्यार्थिनीचा "स्टुडन्ट ऑफ द इयर" ने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षक दिन का साजरा करतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले त्यात त्यांनी स्वातंत्र्य भारताचे प्रथम उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात या दिवशी प्रत्येक विद्यार्थी हा ज्यांनी आपल्याला यशाच्या मार्ग दाखवणाऱ्या व घडविणाऱ्या शिक्षकाचे आभार मानतात तसेच आई-वडिलांनंतर शिक्षकच संस्कार घडविण्याचे काम करतात यावर सविस्तर मार्गदर्शन करीत गुरु व शिक्षका बद्दलचे सर्व दाखले देत गुरुचे स्थान शिष्याच्या जीवनात किती महत्त्वाचे आहे तसेच विद्यार्थ्यांना जीवनात प्रगती करायची असेल तर गुरु विषयी आदर करणे महत्त्वाचे आहे असे आपले मत व्यक्त केले तसेच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे तर आभार प्रदर्शन लेफ्टनंट प्राध्यापक सचिन श्रीरामे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अनामिका चौधरी, हिमांगी शेट्टी, प्राची वाबीटकर, रागिनी निखाडे, तृप्ती बगडे, यामीनी मारापल्ली, प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे, प्रा. डॉ. अजय दहेगावकर, प्राध्यापक डॉक्टर नथू वाढवे, प्रा. डॉ. राजेश हजारे, प्रा.डॉ. शशिकांत सीत्रे, प्रा. डॉ. प्रवीण कुमार नासरे, प्रा. डॉ.कुंदन शहारे, प्राध्यापक संदीप प्रधान, प्राध्यापक लेफ्टनंट सचिन श्रीरामे, प्राध्यापक कुलदीप भोंगळे, प्राध्यापक डाॅ किरण जुमडे, श्री किशोर भोयर, श्री अजय आसुटकर, सौ सुकेशनि भवसागर, श्री शरद भावरकर, श्री प्रमोद तेलंग यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment