लग्नसराईत घरफोडीचा धोका वाढला; वरोरा पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आव्हान.

लग्नसराईत घरफोडीचा धोका वाढला; वरोरा पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन बातमी: वरोरा : लग्नसराईच्या हंगामात अनेक नागरिक आपल्या घरांना कुलूप लावून बाहेरगावी कार्यक्रमासाठी जात असल्याने घरफोडीच्या घटनांचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन वरोरा यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या निवेदनानुसार, घर बंद करून बाहेर जाताना काही महत्त्वाच्या गोष्टींची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. घराचे कुलूप बाहेरून टॉर्च मारल्यावर दिसणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच लोखंडी गेटला बाहेरून कुलूप न लावता आतूनच लॉक करावे, जेणेकरून घर बंद असल्याचे सहज लक्षात येणार नाही. याशिवाय, घरात मौल्यवान वस्तू किंवा मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवणे टाळावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती रात्री किंवा दिवसा फिरताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वरोरा पोलिसांनी नागरिकांना सावध राहून स्वतःच्या आणि परिसराच्या सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ...........

चंद्रपूर जिल्ह्यातील 10 विद्यार्थ्यांना मिळणार व्यवसायिक पायलट प्रशिक्षण*

*चंद्रपूर जिल्ह्यातील 10 विद्यार्थ्यांना मिळणार व्यवसायिक पायलट प्रशिक्षण*

* ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2024*

अकूंश अवथे चंद्रपूर 

 चंद्रपूर, दि.29 : नागपूर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंद्रपूर फ्लाईंग समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील 12 वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र या विषयासह) झालेल्या 10 विद्यार्थ्यांना व्यवसायिक पालटल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता 29 जुलै ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत विहीत नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने http://chandaflying.govbharti.orgअधिक माहिती पाहण्यासाठी क्लिक करा या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती www.chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर प्रशिक्षण फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील स्थायी रहिवासी यांना घेता येईल. तसेच याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याकरीता अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी कळविले आहे.


००००००

Comments