वरोरा, दि. 29 एप्रिल – शेंबळ फाट्याजवळ दि.27/4/26ला रात्री दहा वाजता एका भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले असून सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ट्रॅक्टर चालकाला दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, देवराल (ता. मोहदा) येथील शेतकरी रामराव रामकृष्ण नंदन हे आपल्या मित्राचे ट्रॅक्टर (क्र. MH 34 BR 5019) शेतीच्या कामासाठी वापरतात. ट्रॅक्टर चालक गणेश क्षीरसागर हे वणीहून वरोराकडे येत होते. शेंबळ फाट्याजवळ टोल ओलांडल्यानंतर ते वरोरा बायपासच्या समोर गेले. वाट चुकल्याने ते परत आले आणि वरोराकडे वळत असतानाच वरोराकडून वणीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. MH 04 LY 7972) त्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार ठोसा मारला.
ट्रक चालकाने नाव शब्बीर अहमद (वय ५६, रा. राजुर, ता. वणी, जि. यवतमाळ) असे सांगितले. या अपघातात ट्रॅक्टरचे मुंडीचे दोन तुकडे झाले. रात्री उशिरा ट्रक मालक न आल्याने तक्रार देण्यास उशीर झाला. सोमवारी रामराव नंदन यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तोंडी रिपोर्ट दिली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Comments
Post a Comment