कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हातमाणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रोहीला ट्रस्टचा आधार; ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत मदतीचा हात माणुसकी जपणाऱ्या उपक्रमातून १० वर्षीय चिमुकलीच्या उपचारांना बळ बातमी: चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर तर्फे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या १० वर्षीय कुमारी रोही सिंह हिला मदतीचा हात देण्यात आला आहे. ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत ही मदत करण्यात आली असून, तिच्या उपचारांसाठी महत्त्वाचे सहकार्य मिळाले आहे. मुळचे उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील नागेंद्र सिंह हे सध्या नागपूर येथे उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. त्यांची अल्पवयीन मुलगी रोही सिंह हिला हाडांचा कॅन्सर (Bone Cancer) झाला असून, या गंभीर आजारामुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. अशा कठीण परिस्थितीत ट्रस्टने पुढाकार घेत तिच्या उपचारांसाठी आर्थिक तसेच नैतिक आधार दिला आहे. या उपक्रमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर एका निरागस मुलीला नव्याने जगण्याची आशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रोही ही या आजारावर मात करून पुन्हा आनंदाने जीवन...

*जिल्हास्तरीय तपासणी समितीद्वारे जिल्ह्यातील बालगृहांना भेट*

*जिल्हास्तरीय तपासणी समितीद्वारे जिल्ह्यातील बालगृहांना भेट*

चंद्रपूर, दि. 26 : महिला व बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय तपासणी  समितीने शासकीय मुलांचे बालगृह / निरीक्षणगृह, शासकीय मुलींचे बालगृह/ निरीक्षणगृह आणि महिला ‍विकास मंडळ  द्वारा संचलित किलबिल प्राथमिक बालगृह  दत्तक योजना येथे भेट दिली.
 जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत वरील तिनही बालगृह चालविल जात असून उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय तपासणी समितीद्वारे सदर तपासणी करण्यात आली. यावेळी  बालकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा, आरोग्य विषयक काळजी, स्वच्छता, जेवणाची सुविधा व गुणवत्ता, समुपदेशन सेवा, दैनंदिन लागणाऱ्या वस्तु  आदी विषयी संस्थेच्या पदाधिका-यांसोबत चर्चा करून माहिती घेण्यात आली. याव्यतिरिक्त्त काही मदत लागल्यास किंवा काही अडचण असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय चंद्रपूर, येथे माहिती देण्यास सांगितले. जिल्हास्तरीय तपासणी समितीने जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत बालगृह विषयी माहिती पोहचवणे व जनजागृती करणे बाबत सुचना दिल्या.

 यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, नायब तहसिलदार प्रियंका मानकर, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲङ क्षमा बासरकर, मनोविकृती तज्ज्ञ संदीप भटकर, मानसोपचार तज्ज्ञ प्रियंका मून, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, शशिकांत मोकाशे, दिवाकर महाकाळकर, प्रभावती मुठाळ, नंदा अल्लूरवार, निलेश जक्कुलवार, हेमंत कोठारे, अभिषेक मोहूर्ले आदी उपस्थित होते.

००००००

Comments