आष्टी काकडे येथील बेपत्ता इसमाचा गावातील शेतशिवारातच सापडला मृतदेह. भद्रावती.

आष्टी काकडे येथील बेपत्ता इसमाचा गावातील शेतशिवारातच सापडला मृतदेह.
 भद्रावती.
 बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तालुक्यातील आष्टी काकडे येथील एका 57 वर्षीय इसमाचा अखेर गावातील शेतशिवारातच मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गाव परिसरात खळबळ उडाली आहे.वामन दादाजी काकडे, वय 57 वर्ष, राहणार आष्टी काकडे. असे या मृतक इसमाचे नाव आहे. या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक ती कारवाई केली व मृतदेह भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी पाठविला. मृतक वामन दादाजी काकडे हा गेल्या बारा दिवसांपासून घरातून निघून गेलेला होता. त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिसात देण्यात आली होती. आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान त्याचा मृतदेह गावातील एका शेतशिवारातच आढळून आला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Comments