हऱ्या नाऱ्या यांच्या उपद्रवापाई बाजार समितीचे सदस्य गेले तीर्थयात्रेला

बाजार समितीचे सदस्य सभापतीला कंटाळले, अविश्वास ठराव दाखल.

हऱ्या नाऱ्याच्या उपद्रवामुळे बाजार समितीचे सदस्य गेले तीर्थयात्रेला 

12 सदस्य एकत्रित , वरोरा बाजार समितीत मोठा बदल घडणार.

वरोरा
चेतन लूतडे 

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉक्टर विजय देवतळे यांच्यावर राजू चिकटे व 11 संचालकांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून यावर 5 मार्च रोजी विशेष सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दिले आहे. 18 पैकी 12 संचालक तीर्थाला रवाना झाल्याची चर्चा आहे.

सभापती डॉक्टर विजय देवतळे हे संचालकांना विश्वासात घेत नाही आणि काही मर्जीतील हर्या व नार्याला घेऊन कामकाज करतात. समितीच्या नियमानुसार उप समित्यांचा कालावधी एक वर्षाचा असताना कालावधी संपून सुद्धा उपसमिती नवीन गठीत केली नाही.व कोणताही ठराव घेतला नाही पूर्वीची उपसमिती कार्यरत आहे बाजार समितीच्या नियमानुसार बाजार समितीचे दैनंदिन कामकाज चालत नाही. सभापती डॉक्टर विजय देवतळे यांच्या कार्यकाळात झालेल्या नियमबाह्य कामे आर्थिक घोटाळा त्यावरील चौकशी कायद्यानुसार केली नाही. बैल बाजार, नाफेड खरेदी च्या माध्यमातून काही हर्या व नाऱ्याला घेऊन वसुली केल्या जात असल्याचा आरोप सदस्या तर्फे होत आहे. संचालक मंडळाने अनेक बाबी सभापती देवतळे यांच्या लक्षात आणून दिल्या नंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप 12 संचालकांनी डॉक्टर विजय देवतळे यांच्यावर करीत त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. त्यामुळे वरोडा शहरात ते हऱ्या नाऱ्या कोण याचा शोध घेणे सुरू आहे.

बाजार समितीमध्ये महाआघाडीची सत्ता स्थापन करण्यात आली होती. यावेळी ऊबाठाचे  रवी शिंदे , राष्ट्रवादीचे जयंत टेंमुर्डे व काँग्रेसचे विजय देवतळे यांनी ईश्वर चिट्ठीच्या आधारे ही सत्ता बाजार समिती मध्ये बसवली होती. यानंतर विधानसभेमध्ये भाजप पक्षाचा  जाहीर प्रचार केल्याने आता सभापतींना घरचाच अहेर दिल्याचे समजत आहे. विशिष्ट लोकांची मर्जी सांभाळण्यासाठी सभापतींना सत्ता सोडावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.